Congress Meeting Saam Tv
Video

Congress Meeting: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; कॉंग्रेसची उद्या महत्वाची बैठक, VIDEO

Mallikarjun Kharge Called Important Meeting : उद्या कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तातडीने बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. दरम्यान कॉंग्रेस संदर्भातील मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता बोलावली महत्वाची बैठक बोलावली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेंनिथला बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सामटीव्हीला सुत्रांनी दिलीय. जातीय जनगणना आणि सुप्रीम कोर्टाने SC/ST बाबत दिलेल्या निर्णयावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या होणाऱ्या कॉंग्रेसच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Benefits : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT