Congress MP Prashant Padole Stunt In Flood Saam Tv
Video

VIDEO: पूरस्थितीची पाहणी करायला गेले अन् रिल्स बनवत बसले, भंडाऱ्याच्या खासदाराचा व्हिडीओ व्हायरल

Congress MP Prashant Padole Stunt In Flood: भंडाऱ्यामध्ये पावसाने कहर केला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामध्ये काँग्रेस खासदाराने स्टंटबाजी केली आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे हे रिल्स बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. प्रशांत पडोळे यांच्या पुराच्या पाण्यात स्टंट करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारच्या बोनेटवर बसून ते स्टंटबाजी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशांत पडोळे यांच्यावर टीकेच झोड सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात पावसाने उसंती घेतली असली तरी पूर परिस्थिती अजून कायम आहे. तुमसर तालुक्यातील पूर परिस्थितीच्या पाहणी करण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे आले होते. यादरम्यान त्यांनी पूराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी केली. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे रिल्स तयार केले होते. जे सध्या व्हायरल होत आहे. यावरू जनता पूराने त्रस्त आणि खासदार रिल्स बनवण्यात व्यस्त असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे भंडाऱ्यामध्ये नागरिक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. तर खासदार रिल्स काढत असल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडमध्ये गाण्याच्या तालावर आमदार सुरेश धस यांचा भन्नाट वर्कआउट

Pitrupaksh 2026 : पितृ पक्ष शुभ की अशुभ?शास्त्र काय सांगतं?

Ramesh Mhatre Case : शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार धक्का, डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होणार?

LPG Connection : गॅस कनेक्शनबाबत मोठा बदल! आधार व्हेरिफिकेशन नाही केलं तर LPG लाभार्थी कमी होणार?

Walking Benefits After Lunch And Dinner: जेवणानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT