Congress News SaamTv
Video

Congress Meeting Update : विधानसभेसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा तयार ? 'साम'च्या हाती जाहिरनाम्याची प्रत | Marathi News

Assembly Elections : दिल्लीत आज मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या महाराष्ट्र शिष्टमंडळाची महत्वाची बैठक पार पडत आहे. यात जाहिरनाम्यावर चर्चा होणार आहे.

Saam Tv

कॉंग्रेसची एक महत्वाची बैठक आज दिल्लीत पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होणार असून यात राहुल गांधी राज्यातील सहा प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे. या बैठकीत ज्या जाहिरनाम्यावर चर्चा होणार आहे, त्यातील माहिती समोर आली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू झाली आहे. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होणार असली तरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बनवण्यात येणाऱ्या जाहिरनाम्यावर देखील यात चर्चा केली जाणार आहे. या जाहीरनाम्यात अनेक महत्वाच्या बाबी आहेत. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना प्रती महिना 2 हजार रुपये देणार असल्याचं म्हंटलं आहे. महिलांसाठी मोफत बस सेवा, सर्वांना 25 लाख रुपयांचं विमा कवच, बेरोजगारांना महिन्याला 4 हजार रुपये देणार, दलित-अल्पसंख्यांकांसाठी विशेष योजना राबवल्या जाणार, अशा अनेक मुद्यांचा समावेश कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांवर भर देण्यात आला असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषिसमृद्धी सन्मान योजना महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस आणणार आहे, ज्यात शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं जाणार आहे. प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

SCROLL FOR NEXT