Vishwajit Kadam SaamTv
Video

VIDEO : 'राऊतांच्या अंगात आलं आणि..', विश्वजित कदम यांची संजय राऊतांवर खरपूस टीका

Vishwajit Kadam News : सांगलीच्या कडेगाव तालुक्यात झालेल्या प्रचार सभेत कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मिश्किल शब्दांत टीका केली आहे.

Saam Tv

संजय राऊत याच्या अंगात आले आणि सरकार आले. पण अडचण एवढी झाली की राऊताच्या अंगातील कधी उतरलेच नाही म्हणून सरकार गेले, अशी टीका विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. गेल्या वेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असं वाटत नव्हतं. मी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि सरकार आलं. पण अडचण एवढी झाली की राऊताच्या अंगातील कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं, असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलं, ते सांगलीच्या कडेगाव तालुक्यात प्रचार सभे दरम्यान बोलत होते.

पॉस्कोन कंपनी महाराष्ट्रमध्ये येणार होती. 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. पण दिल्लीतुन फोन आला आणि महायुतीच्या नेत्यांनी कंपनी गुजरातला देऊन टाकली. आपला हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही. पण या महायुतीच्या नेत्यांनी पाप केलं आणि या महाराष्ट्रला दिल्ली आणि गुजरात समोर झुकावे लागले. पण तुम्ही आमच्या पाठीशी उभा रहा पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापाच्या समोर झुकणार नाही, असंही त्यांनी यावेळई बोलताना म्हंटलं आहे.

दरम्यान, 'असं वक्तव्य करताना विश्वजित कदम गोंधळलेले असावेत', असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी याबद्दल बोलताना दिलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT