Rahul Gandhi SaamTv
Video

Rahul Gandhi : राहुल गांधीचं मिशन महाराष्ट्र; ६ नोव्हेंबरला फोडणार प्रचाराचा नारळ

MVA Congress News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी ६ नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी ते प्रचाराचा नारळ फोडून पहिली सभा घेणार आहेत.

Saam Tv

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसची पहिली प्रचार सभा ६ नोव्हेंबरला मुंबईत पार पडणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडणार असून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. याबद्दलची माहिती आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ६ नोव्हेंबरला राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्याकडून प्रचाराचा नारळ फोडत पहिली सभा घेण्यात येणार आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये ही सभा होणार असून यात राहुल गांधी विधानसभेच्या अनुषंगाने ५ गॅरंटी जाहीर करणार आहेत.

६ नोव्हेंबरला राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून नागपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमानंतर ते मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी होणाऱ्या सभेला मविआमधील सर्व वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार आहे, असं नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT