Maharashtra Political News AI Image
Video

Former MLA Rahul Bondre : काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी बजावली नोटीस, १५ दिवसांत मागितलं उत्तर; नेमकं प्रकरण काय?

Former MLA Rahul Bondre News : चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांची पोलिसांकडून चौकशी सुरू. १९९३ पासूनची कागदपत्रे १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयालाही नोटीस.

Alisha Khedekar

चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, संबंधित संस्थांना माहिती सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. १९९३ पासून संस्थांशी संबंधित विविध कागदपत्रे आणि माहिती पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आल्याचे समजते. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासात सहकार्य न केल्याच्या कारणावरूनही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी मिळवल्याचा तसेच बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये बोंद्रे सध्या तीन गुन्ह्यांत जामिनावर आहेत. दरम्यान, काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अडचणी येण्याची अपेक्षा होती, असे बोंद्रे यांनी म्हटले आहे. आपल्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करत, राहुल गांधी यांच्या ‘डरो मत’ या संदेशाचे पालन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT