MVA Politics News SaamTv
Video

VIDEO : मविआमध्ये सीएम पदाची रंगली शर्यत !

Maharashtra Politics : जागावाटपाची खलबतं सुरू असतानाच आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून नवा वाद सुरू झाला आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीत एकीकडे जागावाटपाची खलबतं सुरू असतानाच आता मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारावरून मविआमध्ये वादाची ठिणगी पडलेली बघायला मिळाली आहे. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री हा कॉंग्रेसचाच असेल असं विधान केलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत बराच वाद सुरू असल्याचं दिसून आलं आहे. एकीकडे जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे. तर आता दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरून महाविकास आघाडीत नव्या तिढयला तोंड फोडलं आहे. एकीकडे कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी मुख्यमंत्री हा कॉंग्रेस पक्षाचाच होईल असं मत मांडलं आहे. तर त्यांच्या या विधानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी 'शरद पवार यांची राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. आम्ही या शर्यतीतच नसल्याने त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.' असं म्हंटल आहे. त्यामुळे आता यावर ठाकरे गट शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT