Pune News SaamTv
Video

Pune Congress News : कॉंग्रेसचे पुण्यातील 5 उमेदवार ठरले; मोठी अपडेट आली समोर | Marathi News

Assembly Election News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेसकडून पुण्यातील 5 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहे.

Saam Tv

कॉंग्रेसकडून 5 उमेदवारांची नावं निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच बीगुल वाजलेलं आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून आता सगळे पक्ष उमेदवार निवडीसाठी चाचपणी करायला लागलेले आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नसताना आता कॉंग्रेसकडून पुणे शहरातील 5 उमेदवारांची नावं विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यात रवींद्र धंगेकर, रमेश बागवे आणि दत्ता बहिरट यांना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर भोर आणि पुरंदरमधील देखील नावं ठरली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यात संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या नावावर शिक्करमोर्तब झालं आहे. रवींद्र धंगेकर यांना कसबामधून उमेदवारी मिळू शकते. तर रमेश बागवे यांना खडकी कॉन्टेनमेंट आणि दत्ता बहिरट यांना शिवाजीनगर मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या नावांची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Maharashtra News Live Update: प्लाझ्मावर बंदी करा पण स्पीकरवर निर्बंध नको, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी

Diabetes Healthy Food: मूग, तूर, हरभरा डाळ; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते कडधान्ये खावीत?

Running vs Walking for Weight Loss: धावणे की चालणे, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Gold Price Hike: सोन्याचा भाव ₹२ लाखांवर जाणार? पुढील २-३ महिन्यांत मोठी तेजी येण्याची शक्यता, तज्ज्ञांनी सांगितला अंदाज

SCROLL FOR NEXT