Chandrapur Saam TV
Video

Chandrapur Rada News: खासदाराच्या भावाची मुजोरी? कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण

Saam TV News

चंद्रपुरमध्ये खासदाराच्या भावाने खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हीडिओ आता समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला धक्का पोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची असून या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसत होता. खासदार प्रतिभा धानोरकर या समस्येविषयी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते होते. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली असल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला असून असे काही घडले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT