Raj Thackeray And Devendra Fadnavis saam tv
Video

तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; CM फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर | VIDEO

cm fadnavis responds to raj thackeray challenge : महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांकडून टीका होत असतानाच, राज ठाकरेंनीही पनवेलमधील शेकाप मेळाव्यात सरकारला आव्हान दिलं. एकदा अटक करून दाखवाच, असं ते म्हणाले होते. त्यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Nandkumar Joshi

राज्य सरकारनं विधानसभा अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणलं. या विधेयकावरून विरोधकांकडून टीका होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पनवेलमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. राज्य सरकारने अर्बन नक्षल कायदा आणला असून, कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा अटक करू देच, असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले फडणवीस?

हा कायदा त्यांच्यासाठी केलाच नाही. पण तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागत नाहीत, तर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असं फडणवीस म्हणाले.

जे लोक कायद्याच्या विरोधात जातील, त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे कमेंट्स आहेत, ते कायदा न वाचता केलेल्या कमेंट्स आहेत, असंही उत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT