CM Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde News : पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, म्हणाले... | VIDEO

CM Eknath Shinde : प्रचार सभेच्या दौऱ्यादरम्यान हेलीपॅडवर उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी झाल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या बॅगांची तपासणी होत आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांची प्रचार सभेच्या दौऱ्यादरम्यान हेलीपॅडवर बॅग तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांनी या घटनांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पालघर जिल्ह्याच्या सभेला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची देखील निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आहे.

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या बॅगा तपासतानाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची देखील पालघर जिल्ह्याच्या सभे दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी माझ्या बॅगामध्ये कपडेच आहेत, युरिन पॉट वगैरे नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

SCROLL FOR NEXT