CM Devendra Fadnavis with family performing Ganesh Pooja at Varsha residence during Ganesh Chaturthi 2025 Saam Tv
Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे आगमन|VIDEO

Ganesh Chaturthi: गणेशोत्सव २०२५ च्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा करून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन

सहकुटुंब पूजा-अर्चा करून राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना

गणेशोत्सवामुळे वातावरणात भक्तिभाव व आनंदाचे वातावरण

महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाने मंगलमय उत्सवाची सुरुवात

गेल्या वर्षभरापासून ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या गणरायाचे आज राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र मंगलमय उत्सवाचे स्वर उमटले आहेत.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथेही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. राज्यात सुख-समृद्धी नांदो, सर्वांचे विघ्न दूर होवोत, अशी मनोकामना फडणवीस यांनी गणरायाकडे व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच भक्तिभावाने आणि उत्साहाने वातावरण भारावून गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

Pigmentation: चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय?

आंदोलनादरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला|VIDEO

Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

SCROLL FOR NEXT