CM Devendra Fadnavis criticizes Urban Development Dept; Shinde-Fadnavis rift buzz denied by Uday Samant. Saam TV Marathi News
Video

Maharashtra politics : शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद? मुख्यमंत्र्यांचे नगरविकास खात्याच्या कारभारावर ताशेरे

Eknath Shinde, Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरविकास खात्याच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या योजनांच्या बैठकीत नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा रंगली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंख्यमंत्री फडणवीस यांच्यात ऑल इज नॉट वेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. फडणवीसांनी शिंदेंकडे असणाऱ्या नगर विकास खात्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नगरविकास खात्याचा कारभार सुमार (CM Devendra Fadnavis criticizes Urban Development Dept) असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुधारणा कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांबाबत पुनरावलोकन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नगर विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा रंगली आहे. मंत्री उदय सामंत यांनी हा दावा खोडून काढला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सर्वा काही ठीक असल्याची प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. Is everything fine between Shinde and Fadnavis in Maharashtra?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar On Sanjay Shirsat: नवी मुंबईतील जमीन घोटाळा भोवणार? मंत्री शिरसाटांचा पाय आणखी खोलात?

Pune Ganpati: आतुरता गणरायच्या आगमनाची! पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली

Ladki Bahin Yojana: ग्रामीण लाडकींना मिळणार 5 हजार? केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी योजना?

Maharashtra Politics: टेंडर आणि पार्टनरशिपची ऑफर, खासदार बजरंग सोनवणेंच्या मित्रावर गुन्हा

Jabrat Movie: मैत्री जागणाऱ्या अतरंगी मित्रांची कथा; 'जब्राट' हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT