ladki bahin canva
Video

Ladki Bahin yojana : खूशखबर! लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा,VIDEO

Devendra Fadnavis on Ladki Bahin yojana : डिसेंबरचा सहावा हप्ता मिळणार की लांबणीवर पडणार? याबाबत शंका व्यक्त केल्या जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणाच केलीय.. नेमकं हा हप्ता कधी मिळणार आणि दीड हजार मिळणार की एकवीसशे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. त्यामुळे डिसेंबरचा सहावा हप्ता कधी मिळणार? याचीच प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींना लागलीय. हा हप्ता मिळणार की नाही अशी शंकाही लाडक्यांना आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार असल्याचं सांगितलंय. एवढंच नव्हे तर डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिनाअखेरपर्यंत मिळणार असल्याची घोषणाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलीय.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता दीड हजारावरून एकवीसशे करण्याचं आश्वासन दिलं होतं.. त्यातच आता लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 1400 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केलीय... त्यामुळे लाडक्या बहीणींसाठी सहावा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत मिळणार असला तरी हा हप्ता दीड हजार मिळणार की एकवीसशे? याची उत्सुकता लाडक्या बहीणींसह महाराष्ट्राला लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT