Ladki bahin Yojana CM devendra Fadnavis saam tv
Video

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. पण ही योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांची हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला.

Nandkumar Joshi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. मागील विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहे, असं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ही योजना निवडणुकीपुरतीच होती आणि ती लवकरच बंद होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.

'लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहे, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत, 'बहिणीला सक्षम करणे, हा आपला संकल्प आहे, असेही ते म्हणाले. अनेक लोकांना वाटायचं की निवडणुकीपुरतंच हे भाऊ पैसे देणार आहेत. पण आपण निवडणुकीनंतर ही योजना सुरू ठेवली. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळी या निधीमध्ये वाढ होणार हे ही आम्ही सांगतो....असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: नांदेड-लोहा माहामार्गावर कार पलटी होऊन दोघे जखमी

Chanakya Niti : तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाणक्यांचे हे विचार १००% ठरतील प्रेरणादायी

Shocking : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी कृत्यानंतर कौर्याची सीमाच ओलांडली, शहरात खळबळ

Rasmalai Chocolate Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर, झटपट तयार करा टेस्टी रसमलाई चॉकलेट

SCROLL FOR NEXT