Heavy Rain in Pune City  Saam TV
Video

Pune Heavy Rain : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात पाणी शिरलं; पाहा VIDEO

Pune Rain Latest News Today : पुणे शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेकांच्या घरात पाणी शिरलंय.

Satish Daud

पुणे शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी जमा झालं आहे. 14 वर्षानंतर प्रथमच नारायण पेठेत पाणी शिरलं आहे. स्थानिक प्रशासनाकडून कुठलेही लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय.

एकता नगर आणि शिवाजीनगर परिसरातील अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे. हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झालं आहे. वडगाव शेरी, आनंदनगर बसस्टॉप येथे एका वाहनावर झाड कोसळंय.

सुदैवाने वाहनात असलेली शाळेची मुले व वाहनचालक सुरक्षित आहेत. पावसामुळे पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला बचाव व मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT