Akkalkot SAAM TV
Video

Akkalkot Rain : अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस | VIDEO

Cloudburst Rain Hits Akkalkot Taluka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातील पाणी ओसंडून वाहू लागल्याने वागदारी परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत. महाराष्ट्रातील वागदारी व कर्नाटकातील हिरोळी परिसरात सलग पावसाने नद्या, नाले धोकादायक पातळीवर आले आहेत. शिरवळवाडी तलावातून पाणी वाढल्याने गावांचा संपर्क मार्ग बंद झाला असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पावसामुळे सीमाभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masti 4 vs 120 Bahadur Collection : काटे की टक्कर! रितेश देशमुख की फरहान अख्तर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Girija Oak Godbole: नॅशनल क्रश गिरिजाचं बीचवर फोटोशूट, PHOTOS पाहा

Why Women Feel Colder : पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या कारण

Prarthana Behere: 'पवित्र रिश्ता' फेम प्रार्थना बेहरेचा नवरा कोण आहे? कधी केलं लग्न?

Maharashtra Live News Update : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये घराणेशाही; एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT