Pune rain saam tv
Video

Pune Rain: शिरुरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, दुचाकीस्वारांचा धोकादायक पाण्यातून प्रवास, दुर्घटना घडण्याची भिती|VIDEO

Heavy Rainfall in Shirur: पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याने ग्रामीण भागाला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे,अशातच काही नागरिक आपला जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहे.

Omkar Sonawane

पुणे: शिरुर तालुक्यातील करंदी परिसरात मंगळवारी ढगफुटी सदृश पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले असून, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

करंदी येथील ओढ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्याने परिसरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही काही नागरिक जीव धोक्यात घालून दुचाकीवरून पाण्यातून प्रवास करत असल्याचे चित्र दिसून आले.

स्थानिक प्रशासन व नागरिकांकडून वारंवार सूचना दिल्या जात असूनही काही लोक हे धोकादायक पाण्यातून प्रवास करत आहेत, ज्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नदी, ओढ्यांमध्ये अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT