Kolhapur News SaamTv
Video

VIDEO : चंदगडच्या जागेवरून महायुतीत वाद; हसन मुश्रीफ यांनी केला मोठा खुलासा

Kolhapur Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधील चंदगडच्या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं दिसत आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नियमाप्रमाणे चंदगडची ही जागा विद्यमान आमदाराची असेल मात्र असं असतानाही भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजी पाटील चंदगड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. याबाबत त्यांनी काल जय जवान जय किसान हा मेळावा चंदगडमध्ये घेतला आहे. या मेळाव्याला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्यातच शिवाजी पाटील यांना येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा आवाहन या सभेत केल्यानंतर आता या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं आहे.

चंदगड विधानसभेचे विद्यमान आमदार हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे राजेश पाटील असून महायुतीच्या नियमाप्रमाणे ज्या पक्षाचा स्टँडिंग आमदार त्यालाच उमेदवारी मिळणार आहे. असं असताना आता भाजप नेते शिवाजी पाटील यांनी या जागेवर दावा केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचेच स्टॅंडिंग आमदार या मतदारसंघात असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपचे नेते शिवाजी पाटील यांनी सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. तर शिवाजी पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या तयारी संदर्भात अजित पवार हे योग्य दखल घेऊन त्यातून मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT