nashik Gram panchayat meeting fighting saam tv
Video

ग्रामपंचायत बैठकीत राडा, सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी | VIDEO

Nashik News : नाशिकमध्ये एका ग्रामपंचायतीच्या बैठकीत वाद उफाळून आला. गोवर्धन ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध समस्या, मुद्द्यांवरून बाचाबाची, किरकोळ वाद होत असतात. पण नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. ग्रामसभा सुरू असतानाच हा राडा झाला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता.

नाशिकमध्ये गोवर्धन ग्रामपंचयतीत ही घटना घडली. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ग्रामसभा सुरू असतानाच आधी बाचाबाची आणि नंतर त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. विषय मंजुरीवरून हा वाद वाढला आणि तुंबळ हाणामारी झाली, असं सांगितलं जात आहे.

रिपोर्टनुसार, गोवर्धन ग्रामपंचायतीनं काल, बुधवारी ग्रामसभा बोलावली होती. त्यात गावातील काही कामांच्या विषयांना मंजुरी देणे, त्यानुसार काही विषय मंजुरीला घ्यायचे होते. त्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच विषय मंजुरीवरून अचानक दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात बाचाबाचीनंतर तुंबळ हाणामारी झाली. विषय मंजुरीच्या मुद्द्यावरून हा राडा झाला. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT