Beed News Update SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती; सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल | VIDEO

CID Head Sachin Patil arrived in Beed : संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासाठी सचिन पाटील यांच्यासह सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे.

Saam Tv

सीआयडीचं पथक आता बीडमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडी पथकाचे प्रमुख सचिन पाटील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र वाल्मिक कराड यांचं काय हा सवाल अद्यापही कायम आहे. कारण सीआयडीकडून त्यांच्या अटकेच्या माहितीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

बीडच्या केजमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. 20 दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याने राजकीय वर्तुळातून आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर आता कालपासून या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. आज सीआयडीचं पथक बीडमध्ये झालं आहे. सीआयडी पथकाचे प्रमुख सचिन पाटील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर सीआयडी पथकाने एका महिलेला चौकशीसाठी बोलावलं आहे. मात्र ती महिला कोण यावर अद्याप काही माहिती समोर आली नाही. त्यासोबतच सीआयडीच्या पथकांनी आणखी काही वस्तू देखील ताब्यात घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT