Ind Vs Pak War Saam TV News
Video

China Pakistan : चीनला पाकिस्तान पुळका, भारताविरोधात ड्रगनचा पाकड्यांना पाठिंबा|VIDEO

China Pakistan India tension : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामुळे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे.

Namdeo Kumbhar

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकड्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चीनने आपल्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे निवेदन जारी करत पाकिस्तानच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. भारताने अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील काही कारवायांवरून पाकिस्तानवर आरोप केले होते. भारताचे हे आरोप पाकिस्तानकडून फेटाळून लावले. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत.

चीनने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला आहे. चीनने आपल्या निवेदनात म्हटले की, ते पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतात आणि भारताने संयम बाळगावा. तसेच, शांततापूर्ण चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणि 'चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर' (CPEC) मुळे चीनची ही भूमिका अपेक्षित होती. मात्र, यामुळे भारत-चीन संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया देत आंतरराष्ट्रीय समुदायाला या मुद्द्यावर लक्ष देण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद! समोरून येणाऱ्या दोन बाईकस्वारांची एकमेकांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Kalyan Murbad : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट, रेल्वे मंत्र्यांनी सांगितला सर्वात मोठा अडथळा

Maharashtra Live News Update: युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस धारकांना फटका

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT