Chicken shawarma food poisoning saam Tv
Video

Chicken Shawarma Poisoning: चिकन शॉरमा बेतेल जीवावर; शोरमा खाऊन 5 मुलांना विषबाधा

Chicken shawarma food poisoning : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुम्ही शोरमा खात असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल. असं आम्ही का म्हणतोय हे तुम्हीच पाहा.

Tanmay Tillu

स्ट्रीट फुड असलेल्या शॉरमाचा चाहता वर्ग प्रचंड आहे. स्ट्रीड फुड विक्रेत्यांमध्ये दर चार किंवा पाच दुकानांमागे तुम्हाला शॉरमाचं दुकान आढळेलच. मात्र चवीचवीनं शॉरमा खाणाऱ्यांना धास्तावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये उघड्यावर विकला जाणारा शॉरमा खाल्ल्यानं 5 मुलांची प्रकृती बिघडली. या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडालीये.

पाच मुलांना शोरमा खाल्ल्यानं विषबाधा झाली. अन्न आणि औषध प्रशासनाने उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं शहरात आणि तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरीक विक्री करत आहेत, त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या,पोटदुखी होत असल्याचा आरोप विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांनी केलायं...अन्न आणि औषध प्रशासनाने आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जातेय.. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोगाचा प्रश्न ऐरणीवर आलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT