VIDEO: मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे खासगी सचिव निवडणुकीच्या रिंगणात?  Saam TV
Video

VIDEO: मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे खासगी सचिव निवडणुकीच्या रिंगणात?

Eknath Shinde News: शिंदेंचे खासगी सचिव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, दोन महिन्यांपूर्वी पदाचा दिला होता राजीनामा.

Uday Satam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच खतगावकर यांनी आपल्या खासगी सचिव पदाचाही राजीनामा दिला असून ११ ऑगस्टला नांदेडच्या मुखेड मतदार संघात बालाजी खतगावकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाला मंत्री शंभुराजे देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कामांशी प्रभावित होऊन खतगावकर समाजकारणात उतरत असल्याची चर्चा होत आहे. खतगावकर यांनी राजकिय प्रवासाची सुरूवात जरी केली असली तरी मतदारसंघ अद्याप झालेला नाही. त्यामुळे बालाजी खतगावकर यांना कोणत्या मतदार संघाची जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT