Sambhajiraje Chhatrapati SaamTv
Video

Sambhajiraje Chhatrapati : चुकीचं काही होता कामा नये; 'छावा'च्या ट्रेलरवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया | Video

Chhaava Movie Controversy : लक्ष्मण उतेकर यांचा संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. त्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

लक्ष्मण उतेकर यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून मराठा क्रांती मोर्चाचा या चित्रपटातील काही दृश्यांना विरोध असल्याचं बघायला मिळत आहे. विकी कौशल आणि रश्मिकाची प्रमुख भूमिका असलेल्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र ट्रेलर रिलीज होताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बघायला मिळत आहे. यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेलं नृत्य चुकीचं आहे. उतेकर यांना मी इतिहास संशोधक आणि आमच्या टीम बरोबर बैठकीबाबत बोललो होतो. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण काय दाखवतो याचा विचार व्हावा. लक्ष्मण उतेकर हे मराठी माणूस आहे, त्यांनी खूप मोठं धाडस केलं आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊ, पण चुकीचं काही होता कामा नये, ही अपेक्षा आहे. अजूनही वेळ गेली नाही, उतेकर यांनी इतिहास संशोधक यांची मिटिंग घ्यावी, दुरुस्ती होईल, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT