Chhatrapati Sambhajiraje Saam Tv News
Video

Video: छत्रपती संभाजीराजे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

काही नुकसान ग्रस्त शेतकरी आत्महत्या कराचा इशारा देत आहेत. शेती नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना राजेंनी धीर दिला.

Rachana Bhondave

छत्रपती संभाजी राजे आज नांदेड जिल्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील अनेक गावांना राजे भेटी देत आहेत. हदगाव तालुक्यातील अनेक गावांना नदी,नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बसला. पैनगंगा, कयाधु नदीला मोठा पूर आला होता. या नदीच्या पुराचे पाणी शेतीत शिरल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आज छत्रपती संभाजी राजे यांनी हदगाव तालुक्यातील उंचाडा, मारलेगाव,करमोडी, यासह अनेक गावांना पैनगंगा आणि कयाधु नदीच्या पुराचा फटका बसला.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे हे हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.शेती पिकांच्या नुकसानीची राजे यांनी पाहणी केली.शेतीचे नुकसान पाहून मनाला वेदना झाल्या.शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं,अनेकांची घरे या या अतिवृष्टीमुळे पडली आहेत. असं असताना कृषिमंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी न करता कृषिमंत्री व्यस्त आहेत हे शोभते का कृषी मंत्र्यांना? कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर छत्रपती संभाजी राजे यांनी टीका केलीय. शेतकऱ्यांच्या बांधावर या पहा शेतकऱ्यांच्या वेदना. नुकसानग्रस्त भागातील लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT