abdul sattar news  Saam tv
Video

धक्कादायक! माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं

abdul sattar news : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिर अपवित्र झाल्याचे म्हणत काही तरुणांनी गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा प्रकार समोर आलाय. अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने आज दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर काही तरुणांनी सत्तार यांच्या याच दर्शनावरून आक्षेप घेतला आहे. अब्दुल सत्तार सकाळी जेवणात मांसाहार करतात, त्याशिवाय घर सोडत नाही. त्यामुळे अशा अपवित्र माणसाला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश देण्याला विरोध असल्याचे म्हणत या तरुणांनी मंदिरात गोमित्र शिंपडून मंदिर स्वच्छ केलंय. या प्रकारानंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT