Rain Updated  Saam TV
Video

VIDEO : बाईक वाचवायला धडपडले, पण दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले, धडकी वाढवणारा व्हिडिओ बघा!

Rain Update : मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धूमाकूळ घातलाय.

Namdeo Kumbhar

छत्रपती संभाजीनगर : जिवाच्या आकांताने पूराच्या पाण्यातून बाईक वाचवण्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला. बाईक वाचवण्याचा प्रयत्नात तोच वाहून गेलाय. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी येथे घडली. धांड नदीवरच्या पुलावरून मोटरसायकलवरचे दोघे वाहून गेले. सुदैवाने त्या दोघांना वाचवण्यात यश आले. पण दुचाकी मात्र वाहून गेली.

मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धूमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पूराच्या पाण्यात दुचकी घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन जणांनी केला. पण बाईकसोबत तेही त्या पाण्यात कोसळले. सुदैवाने त्या दोघांना वाचवण्यात आले. पण बाईकमात्र पाण्यात वाहून गेली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी येथी धांड नदीला पूर आला. त्यातच गावात येऊन मिळणाऱ्या निम नदी व पाडळी नदी या उपनद्यांनाही पूर आल्याने दुथडी भरून वाहत होत्या. धांड नदीवर जाणेफळ येथे पुलावरून मोटर सायकलस्वारन पुढे जाण्याच्या प्रयत्न केला, त्यात मोटरसायकल वर असलेले दोघेजण गाडीवरून खाली पडले.

पाण्याच्या प्रवाह व वाहून जात असताना आरडा ओरड केल्याने त्यांना वाचवण्यात यश आले. मात्र मोटार सायकल प्रवाहात वाहून गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT