Kannad Taluka Rain News Saam TV
Video

Rain News : कन्नड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; जमिनी खरडल्या पिके गेली वाहून, पाहा VIDEO

Kannad Taluka Rain News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या सायगव्हाण परिसरात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.

Satish Daud

छत्रपती संभाजीनगर : मागील दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या असून खरीप हंगामातील पिके वाहून गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहे.

सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील सायगव्हाण परिसरात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील गडदगड नदीला पूर आला.

वेचणीला आलेला कापूस, काढलेल्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. शेतात आणि शेतातील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळित झाले. शासनाने त्वरीत या भागातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'महाज्योती'चा एमपीएससी परीक्षेत दबदबा, ४६१ पदांपैकी ११२ विद्यार्थ्यांनी नोंदविला ठसा

Summer Hair Care : डोक्यावर टक्कल पडू लागलंय? आताच करा 'हा' रामबाण उपाय, नवे-घनदाट केस उगवतील

घराला अचानक हादरे, मांडणीवरील भांडी पडली; भूकंपाच्या धक्क्याने लोक रस्त्यावर धावत सुटले

Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

High Cholesterol: वजन वाढल्यामुळे वाढू शकतो कोलेस्टेरॉल अन् हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT