Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! 'लाडकी बहीण योजने'साठी पैसे उकळले; महिलेवर गुन्हा

Case Registered Against Woman For Brokerage for Ladki Bahin Yojana: छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पैसे उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल झालाय. राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

Rohini Gudaghe

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार लाडकी बहिण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याच्या आरोपावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय.

लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.वंदना म्हस्के गरीब महिलांना लुटत असल्याचं काही महिलांनी तहसीलदारसमोर गाऱ्हाणे मांडलं. त्यानंतर त्यांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार गुन्हा दाखल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

Maharashtra News Live: शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, नेमकं झालं काय?

PM Modi: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या, पण...' पंतप्रधान मोदींनी GEN-Z ना केलं मोठं आवाहन

Kothimbir Vadi Recipe: घरच्या घरी बनवा खमंग कोथिंबीर वडी; चहासोबत लागेल भन्नाट चव

SCROLL FOR NEXT