Maharashtra Sadan Maharashtra Sadan
Video

Chhagan Bhujbal : विधानसभेच्या तोंडावर भुजबळांच्या चिंतेत वाढ, महाराष्ट्र सदनप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता

Maharashtra Sadan : विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Sadan Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या दोषमुक्ती विरोधात दाखल आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. 9 सप्टेंबर 2021 ला एसीबीच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केलं होतं. मात्र त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान देण्यात आलं होतं.

या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर सुनावणी थंडावली होती.

याच आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलेय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT