Chhagan Bhujbal SaamTv
Video

Chhagan Bhujbal News : मंत्रिपदापासून भुजबळांना का दूर ठेवलं? कारणं आली समोर, पाहा Video

Mahayuti Cabinet Expansion News : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नसल्याने ते नाराज आहेत.

Saam Tv

महायुतीत अनेक गोष्टींमुळे वाद निर्माण झाले आहेत. त्यात आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना यावेळई मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ हे सध्या प्रचंड नाराज असल्याचं बघायला मिळत आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवलं आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद का देण्यात आलं नाही, याची काही कारणं आता समोर आली आहे.

भुजबळ यांनी नाशिकमध्ये आपल्याच पक्षाच्या विरोधात काम केलं असल्याची तक्रात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वरिष्ठांना केली आहे. तर भुजबळ यांना मंत्रिपद दिलं तर एकत्रित राजीनामा देऊ असा इशाराही आमदारांनी अजित पवार यांना दिला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नाशिकच्या राष्ट्रवादीत भुजबळ यांच्या विरोधात नाराजी आहे. पंकज भुजबळ यांच्यासाठी केलेली आमदारकीची बळजबरी वरिष्ठांना नापसंत होती. समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीने महायुतीतले इतर पक्ष देखील नाराज दिसून आले. त्यामुळे नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादीत असलेला अंतर्गत कलह समोर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT