Chhagan Bhujbal News SaamTv
Video

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ दिल्लीत कोणाची भेट घेणार? मोठी अपडेट आली समोर | Marathi News

Mahayuti Cabinet Ministry News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून नाराज आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर भुजबळ आता दिल्लीला रवाना झाले आहेत.

Saam Tv

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे दिल्लीला जाणार आहेत. ते दिल्लीत कोणाची भेट घेणार हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून नाराज असलेले छगन भुजबळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीला जाणार आहेत. ते दिल्लीत नेमकी कोणाची भेट घेणार हे अद्याप समजलेलं नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र अद्यापही भेट भुजबळांनी घेतलेली नाही. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने यांनी हालचाली देखील सुरू केल्या आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर अर्धा तास त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी 8-10 दिवसांचा वेळ मागितला असल्याचं यावेळी भुजबळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे. त्यानंतर आता ते दिल्लीला जाणार आहेत. तिथे ते कोणाला भेटणार? त्यांची पुढची भूमिका काय असणार? अजित पवार यांची साथ छगन भुजबळ सोडणार का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT