Chhaava Controversy Youtube
Video

Chhaava Controversy : 'छावा' वादाच्या भोवऱ्यात, लेझीम नृत्यावरुन पेटला वाद; पाहा स्पेशल रिपोर्ट

Chhaava Movie : संभाजी महाराजांच्या जीवनावरील 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील कोणत्या दृश्यावर आक्षेप आहेत? आणि कुणी चित्रपटाचं समर्थन केलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chhaava Movie Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटातील दृश्यावरुन आता नवा वाद पेटलाय.. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेलाच. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलं आहे. आणि याला तीव्र आक्षेप घेतला जात आहे..

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टींवरुन वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय. तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिलीय.

अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यावरुन वाद पेटत असतात. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का? असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्ताने उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT