Nashik Accident Saam TV
Video

Nashik : नाशिकमध्ये अपघाताचा थरार, ३ महिलांना ट्रकने चिरडलं | VIDEO

Tragic Accident in Chandwad : चांदवड येथे पेट्रोल पंप चौफुलीवर रस्ता ओलांडणाऱ्या ३ महिलांना पाठीमागून येणाऱ्या अवजड ट्रकने चिरडले आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, इतर दोन गंभीर जखमी झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीवर रस्ता ओलांडत असलेल्या तीन महिलांना पाठीमागून आलेल्या अवजड ट्रकने चिरडल्याने एक महिला ठार आणि दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिला गुणमाला श्रीपाद पहाडे (वय 65, रा. सोयगाव, मालेगाव) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुशीला श्रीपालचंद पहाडे आणि अनिता विनोद पहाडे या दोन महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या तिन्ही महिला लासलगावमधील नातेवाईकांकडील कार्यक्रम आटोपून मालेगावकडे जात होत्या. चांदवड बसस्थानकावर मालेगावकडे जाणारी बस नसल्याने त्यांनी रस्ता ओलांडून महामार्गावरून बस पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ट्रक (क्रमांक MH 19 CY 9313) मालेगावच्या दिशेने जात असताना त्याने या महिलांना चिरडले.या भागात बससेवा थेट बसस्थानकावर न येता महामार्गावरूनच चालते, त्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला व वृद्धांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बसस्थानकावरूनच थेट बससेवा सुरु करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT