Chandrashekhar Bawankule 
Video

Chandrashekhar Bawankule : जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Assembly Election: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलीय.

Bharat Jadhav

भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. कामठी मतदरासंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पहिली यादी आज जाहीर केली असून यात वाबनकुळे यांची प्रतिक्रिया दिलीय. आमचे जे ९९ उमेदवार जाहीर झाले आहे, ते महायुतीमध्ये चांगल्या मतांनी निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादवजी या सर्वांनी बसून एक चांगला निर्णय घेतलेला आहे.

आम्ही राज्याच्या विकासासाठी आम्हाला सरकार हवंय, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीच सरकार राज्याचं विकास करणार. उमेदवारी मिळण्यावरून बावनकुळे म्हणाले, जेव्हा जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते, मागील वेळेस संघटना सांभाळायला सांगितली आता निवडणुक लढायला सांगितले. महायुतीतील वादाविषयी ते म्हणाले, आमचा काही वाद नाही, आमचे तीनही पक्षाचे उमेदवार जे जिंकू शकतात असेच आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT