Chandrakant patil News SaamTv
Video

Chandrakant Patil News : पुण्यात शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटीलांचा उमेदवारी अर्ज दाखल

Pune Assembly Election : गुरुपुष्यामृत योग साधून आज अनेक नेत्यानी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यात देखील चंद्रकांत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं दिसलं.

Saam Tv

राज्यातील उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षातील अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. पुण्यात देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. कोथरुड विधानसभेसाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुड भागामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, फुलांची उधळण करत चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आलं. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि शंकर महाराज मठामध्ये दर्शन घेतलं. पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला आहे.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बडे नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT