Maharashtra Politics 
Video

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवं वळण? ठाकरे - भाजप एकत्र?

Political News: विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीमुळे शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना गती मिळाली आहे. पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची गप्पा रंगली.

Dhanshri Shintre

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्यात राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या असून, आता भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच उद्धव ठाकरे आणि भाजप युती करण्याचे थेट संकेत दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर आपली पुन्हा एन्ट्री झाली तर तो आनंदाचा क्षण असेल.

मुंबईतील एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी हसत हसत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला, युती कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं, मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहे. त्यावर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. या संवादानंतर उद्धव ठाकरे यांनी युतीला दुजोरा दिला असून, त्याच्या शक्यतेबद्दल विश्वासार्ह सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या संभाव्य युतीबद्दल चर्चा वाढली आहे, आणि भविष्यातील राजकीय घडामोडींवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT