Ajit Pawar Seat Sharing News SaamTv
Video

VIDEO : अमित शहांचा अजितदादांना 'त्यागा'चा सल्ला; पाहा काय म्हणाले अमित शहा

Assembly Elections : विधानसभेसाठी अजित पवार यांनी अधिकच्या जागांचा आग्रह धरू नये असा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांना कमी जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.

Saam Tv

विधानसभेत अजित पवार यांनी अधिकच्या जागांचा आग्रह सोडवा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांना दिला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा सल्ला दिला आहे. या बैठकीत महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ठरल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागावाटपाबाबत अंतिम बैठक पार पडली आहे. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अजितदादांनी वाढवा जागांचा आग्रह सोडवा असं अमित शहा यांनी म्हंटलं आहे. अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी याबाबत अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. लोकसभेला जागावाटपा बाबत आपण त्याग केला होता, त्यामुळे आता विधानसभेत आपल्याला वाढीव जागा देण्यात याव्यात अशी मागणी नेत्यानी अजितदादांना केली होती. मात्र आता विधानसभेत देखील अमित शहा यांनी अजित पवारांना अधिकच्या जागांचा आग्रह सोडण्याचा सल्ला दिला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता जागावाटपात अजित पवार यांच्या गटाला किती जागा येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT