Onion News SaamTv
Video

Onion Scam : कांदा खरेदी घोटाळा प्रकरणी १५ कंपन्यांवर कारवाईचा बडगा | Video

Nafed and NCCF Onion Scam : नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणी आता केंद्राकडून १५ कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

Saam Tv

नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. साम टीव्हीने या घोटाळ्याचा पडदाफाश देखील केला होता. याच प्रकरणी आता केंद्र सरकारने कारवाई केली आहे. NCCFशी संबंधित १५ उत्पादक कंपन्यांना सरकारने दणका दिला आहे. १५ फार्मर कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेलं आहे. तसंच या १५ कंपन्यांचे व्यवहार केंद्राने थांबवले आहेत.

नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत केवळ कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून कोट्यवधीची फसवणूक करण्यात करण्यात आलेली होती. या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर साम टीव्हीने संपूर्ण प्रकरणाचा पडदाफाश केला होता. त्यानंतर आता या प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आलेली आहे. NCCFसोबत संबंधित १५ उत्पादक कंपन्यांवर सरकारने कारवाई करत दणका दिलेला बघायला मिळाला आहे. NCCF शी संबंधित ८० ते ९० फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी कांदा खरेदीचे व्यवहार केले होते. केवळ कागदावर ही खरेदी दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली होती. त्यापैकी १५ कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. या कांदा खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता केली आहे. तसंच भ्रष्टाचार केलेला पैसा वसूल करत शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT