Cinet Election SaamTv
Video

Cinet Election : विधानसभेआधी मातोश्रीबाहेर जल्लोष! आदित्य ठाकरेंनी गुलाल उधळत भावाला मारली मिठी; वरुण सरदेसाईंचा आनंदही गगणात मावेना

Thackrey Group : मुंबई विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 विजय मिळवल्यानंतर मातोश्रीवर जल्लोष करण्यात येत आहे.

Saam Tv

मुंबई विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागांवर विजय मिळवल्यानंतर ठाकरे गट युवा सेनेकडून मातोश्रीवर जल्लोष करण्यात येत आहे. 10 पैकी 10 जागांवर ठाकरे गटाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभूत केलं आहे. त्यानंतर शनिवारी मातोश्रीवर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई यांनी गुलाल उधळत जल्लोष केला आहे. यावेळी आदित्य आणि तेजस या दोन्ही भावंडांनी एकमेकांना गुलाल लाऊन भावुक होत मिठी मारलेली दिसून आली. तर वरुण सरदेसाई यांनी बॅन्डच्या तालावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेआधीच मातोश्रीवर उधळले गेलेल्या या गुलालाने कार्यकर्त्यांत उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विद्यापीठांच्या १० नोंदणीकृत १० पदवीधारांच्या जागांकरिता मंगळवारी २४ सप्टेंबर मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत दहाही जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेने विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT