Abdul Sattar Saam TV
Video

Abdul Sattar: शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी होणार रद्द?

Maharashtra Assembly Election 2024: शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महायुतीने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे. सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे केली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर देखील ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रामध्ये खोटी, भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे. शपथपत्रात खोटी माहिती नमूद करणे प्रचलित कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळं सत्तार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पोलिस आयुक्तलयात जाणार

Sanjay Raut : 'ED धाडीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाऊ शकतात' संजय राऊत यांचा भुसेंवर हल्लाबोल | VIDEO

OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी! पण OTT प्लॅटफॉर्म्स नेमके कधी आणि कसे होतात बंद? वाचा सविस्तर

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो? तारीख आणि इतिहास घ्या जाणून

SCROLL FOR NEXT