Accident news  AI Image
Video

Accident News : महामार्गावर विचित्र अपघात! दाट धुक्यामुळे ५० वाहनं एकमेकांना धडकली; ११ जणांचा मृत्यू

Bulgaria Accident News : बल्गारियातील A1 महामार्गावर दाट धुक्यामुळे सुमारे ५० वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर जवळपास ५० जण जखमी झाले. बचावकार्य आणि तपास सुरू.

Alisha Khedekar

बल्गारियामध्ये मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. पूर्व बल्गारियातील महामार्गावर दाट धुक्यामुळे सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी सोफिया ते बर्गास शहराला जोडणाऱ्या A1 महामार्गावर घडला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघात इतका भीषण होता की महामार्गावरील सहाही मार्गांवर कार आणि ट्रकचा खच पडला होता. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर काही वाहने उलटली होती. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली.

बल्गारियाचे पंतप्रधान रुमेन रादेव यांनी या घटनेला मोठी दुर्घटना म्हटले आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाशिम पोलिसांची मोठी कारवाई! पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत; तीन जिल्ह्यांतील गुन्हे उघडकीस

NCP Merger: मोठी बातमी! जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील, विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Bharli Bhendi Recipe : मसाला भरल्या भेंडीची चव होईल दुप्पट! भाजीत शेवटी टाका चमचाभर 'हा' खास पदार्थ

Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर रिलीज; आर्मी यूनिफॉर्ममध्ये भाईजानचा दमदार अंदाज!

UPI MDR Charges : UPI पेमेंटवर आता एक्स्ट्रा चार्ज? ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT