Video

Budget Session: घर खरेदी करणाऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार, अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

Stamp Duty Hike: राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून यामध्ये घोषणांचा पाऊस पाडण्यात आला, मात्र सामान्य माणसाला आता घर घेताना आर्थिक भार सोसावा लागणार आहे.

Omkar Sonawane

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी घर खरेदीसंदर्भातील वाढीव शुल्कामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

घर खरेदी करताना लागणारी स्टॅम्प ड्यूटी वाढणार असल्याचे अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी स्पष्ट केले. अधिनियम कलम 4 नुसार एका व्यवहारासाठी एकापेक्षा अधिक दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांसाठी स्टॅम्प ड्यूटी 100 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1)नुसार दस्तऐवजांच्या स्टॅम्प ड्यूटी अभिनिर्णय प्रक्रियेसाठीचे शुल्क 100 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे घर खरेदी करताना नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार असून सर्वसामान्यांना घर घेणे अधिक महाग होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT