- निर्मला सीतारमन यांच्याकडून राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांना बजेटची कॉपी सुपूर्द, अर्थमंत्री संसद भवनात दाखल. थोड्याच वेळात सादर करणार बजेट.
- अर्थमंत्री सीतारमण आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता. १० लाखांपर्यंत कमाई करमुक्त होण्याची अपेक्षा.
- येत्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ६.३ ते ६.८ टक्के राहण्याची शक्यता, जीएसटी संकलन वाढणार, आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर.
- अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८०० तर निफ्टीही २५० अंकांनी उसळला.
- मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महागला. प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार.
- पुण्यात 'जीबीएस'नं टेन्शन वाढवलं, मृतांची संख्या पाचवर तर रुग्णसंख्या १४० वर.
- फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा. राज्यातील थंडी संपली, सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज.
- राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह. सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी.
- BCCI कडून सचिन तेंडुलकरचा गौरव. सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारानं आज होणार सन्मान.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.