Eknath Shinde News AI Image
Video

Thane : मोठी बातमी! मध्यरात्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर पोलीस गाडीला आग

DCM Eknath Shinde Thane Home News : एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Alisha Khedekar

ठाण्यातील लुईसवाडी परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर शुक्रवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस एस्कॉर्ट वाहनाला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांची अनेक वाहने रांगेत उभी होती. त्यापैकी एका वाहनातून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणांतच या धुराचे रूपांतर आगीत झाले. ही घटना लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनीही बादल्यांमधून पाणी टाकून आग विझवण्यास मदत केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वाहनाला आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आई-बहिणीवर तलवारीने वार, नंतर प्रेयसीचं अपहरण; तिला संपवतो किंवा मी संपतो, प्रियकराचा पोलिसांसमोर थरार

Maharashtra News Live Update: शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

Kamali Serial: 'कमळी' मालिकेतील दिवाळीत मोठा ट्विस्ट! कमळीचा होणार नवा मेकओव्हर, पण लग्नमंडपातून जाणार पळून

Ramayana Collection : रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जगभरात जादू! दुसऱ्याच दिवशी २०० कोटी पार, बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम

Bedsheet Changing Tips: सणासुदीला नवीन बेडशीट बदलताय? जाणून घ्या नवीन बेडशीट किती दिवसांनी बदलावी?

SCROLL FOR NEXT