Narendra Modi Cabinet Reshufle  AI Image
Video

Breaking News : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल होणार? नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; दिल्लीत हालचालींना वेग

Political Breaking News: केंद्रातील मोदी सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता. NDA मित्रपक्षांना अधिक प्रतिनिधित्व मिळणार? नव्या चेहऱ्यांना संधी आणि काही मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची चर्चा.

Alisha Khedekar

देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मित्रपक्षांशी चर्चा केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

एनडीएमधील घटक पक्षांना सरकारमध्ये अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही मित्रपक्षांच्या नेत्यांना केंद्रात, तर काहींना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या संभाव्य फेरबदलात केवळ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार नाही, तर सध्या मंत्रिपदावर असलेल्या काही नेत्यांची जबाबदारीही बदलली जाऊ शकते. केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी नव्या नेत्यांना संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर कोणाला मंत्रिपद मिळणार आणि कोणाची जबाबदारी कमी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोसायट्यांच्या लिफ्टसाठी कडक नियम! सर्व्हिसिंग, थर्ड-पार्टी इन्शुरन्सचे नवे आदेश, पाहा A टू Z माहिती

Maharashtra News Live Update: पुढील आठवड्यात दूध दरवाढीची बातमी मिळणार - राजेश पाटील

Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग

Manoj Jarange : ५०० कोटींनंतर मनोज जरांगेचा आणखी एक नवीन ऑडिओ बॉम्ब; मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंना अडचणीत आणणार

Hair Care: हिवाळ्यात डोक्यात खाज आणि कोंडा वाढलाय? 'हा' सोपा घरगुती उपाय करा ८ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT