MHT CET Exam News  AI Image
Video

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

MHT-CET Exam 2027 Timetable Update News : MHT CET 2027 परीक्षेबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर सीईटी सेलचे स्पष्टीकरण. परीक्षा रद्द झाल्याची किंवा डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट.

Alisha Khedekar

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. MHT CET २०२७ परीक्षेबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विविध दाव्यांवर सीईटी सेलने स्पष्टीकरण दिले आहे. डिसेंबर महिन्यात सीईटी परीक्षा आयोजित केली जाणार असल्याची किंवा परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती चुकीची असल्याचे सेलने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सीईटी सेलने परिपत्रक जारी केले आहे. तसेच ही परीक्षा १२वीची परीक्षा झाल्यांनतर फेब्रुवारी मार्चच्या आसपास होणार असल्याचे म्हटले. सीईटी परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशाराही सीईटी सेलने दिला आहे. व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीईटी सेलने सोशल मीडिया मॉनिटरिंग टास्क फोर्स स्थापन केला आहे. परीक्षेबाबत खोटी माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आढळल्यास विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी socialmedia.complaints@mahacet.org या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेनंतरच एमएचटी सीईटी २०२७ परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती सीईटी सेलच्या सूत्रांकडून मिळत आहे. परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांनी अधिकृत माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या वेबसाईटवर चेक करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

SCROLL FOR NEXT