Ravindra Waikar News SaamTv
Video

Ravindra Waikar : वायकरांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; कीर्तिकरांची याचिका फेटाळली|Marathi News

Mumbai High Court News : मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. यांच्या त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

Saam Tv

वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतमोजणीत फेरफार करून रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं, असा कीर्तिकर यांचा आरोप होता.

मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तिकर यांचा आरोप होता. आज न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने या याचिकेवर निर्णय दिला आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी अमोल किर्तीकर EVM मतमोजणीत एका मताने आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतमोजणीत ४८ मतांनी वायकर यांचा विजय झाला. यात वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४ मते, तर किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT