Pune airport saam tv
Video

India Pakistan Tension: पुणे विमानतळावर अचानक ब्लॅकआऊट, नेमकं कारण काय? VIDEO

Pune News: जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिल पार पडला.

Omkar Sonawane

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, त्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर आज रात्री ८.३० वाजता ब्लॅकआउट ड्रिल पार पडला.

या सरावाचा उद्देश म्हणजे विमानतळाच्या सुरक्षेच्या तयारीची चाचणी घेणे व आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद प्रक्रियेत सुधारणा करणे. पुणे विमानतळावर सीआयएसएफ, एअरलाइन्स आणि इंडियन एअर फोर्स (IAF) यांच्या समन्वयाने हा ब्लॅकआउट ड्रिल आयोजित करण्यात आला.

ही ब्लॅकआउट ड्रिल नियोजित होती आणि ती पूर्णतः सरावाचा भाग होती. यामध्ये संपूर्ण प्रकाशयोजना बंद करून, तातडीच्या परिस्थितीत काय कारवाई केली जाईल याचा आढावा घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या विमानतळ परिसरातील आपत्कालीन व्यवस्थापन कितपत सक्षम आहे, याची चाचणी घेणे हा या ड्रिलचा मुख्य उद्देश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT